जळगांव:- विद्यार्थांच्या कल्पनाशक्तीचा, ग्रहणशक्तीचा, वाचन कलेचा विकास होऊन त्यांचेवर विविध नैतिक मूल्यांचा संस्कार व्हावा या हेतूने शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात किशोर महोत्सव :- 25, अंतर्गत इ. ५ वी ते ७ वी वर्गासाठी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे उपमुख्याध्यापक श्री. प्रशांत जगताप ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री. संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. सुवर्णा वंजारी, उपप्रमुख सौ.स्मिता करे, स्पर्धा प्रमुख सौ. मंगला भारुळे, उपप्रमुख श्री.अशोक पाटील यांच्या हस्ते माता सरस्वती पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली.

या उपक्रमात ३८ विद्यार्थांनी सहभाग घेऊन नैतिक मूल्यांवर आधारित, क्रांतिकारक, थोर समाजसुधारक, रामायण व महाभारत, शेतकऱ्यांच्या विविध समस्यावर आधारित बोधपर कथा सादर केल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. वृषाली पाटील, परीक्षक म्हणून सौ. रेखा पाटील, सौ. जयश्री नेहेते, सूत्रसंचालन श्री. आनंद पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सौ. योगिता तडवी यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मयुर पाटील, श्री.गौरव देशमुख तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!