प्रशासनाच्या अजब कारभारा विषयी स्वराज्य वार्ता लाईव्ह न्युज चे मराठवाडा विभागीय प्रतिनिधी तसेच समाजसेवक अनिरुद्ध साबळे यांचे गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन.

मौजे. वडिरामसगाव तालुका घनसांगवी, जि.प. प्रा.शा वडिरामसगाव येथील शिक्षक यांना प्रशासनाच्या आदेशाने तहसिल कार्यालय घनसावंगी येथे पदवीधर नोंदणी साठी नियुक्त करून घेतले आहे, सदरील शिक्षक हे गेल्या १० दिवसापासून शाळेवर नसल्या कारणाने शालेय विद्यार्थी यांचे शैक्षणिक अतोनात नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान प्रशासन भरून देणार का? याच गोष्टीसाठी आम्ही आमच्या मुलांना जि. प. च्या म्हणजेच सरकारी शाळेत पाठवावे का? अश्याच गोष्टीमुळे आज अनेक शासकीय मराठी शाळा बंद होण्याच्या अवस्थेत येऊन थांबल्यात तरी सरकार आणि प्रशासनाच्या हे लक्षात येत नाही का? की जाणीव पूर्वक अश्या पद्धतीने शासकीय जि.प. मराठी शाळा बंद पडण्यासाठीच असे काम शिक्षकांना दिले जाते? असे संतापजनक प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विचारले जाऊ लागले आहेत, अशी गावात चर्चा आहे.

तरी आम्हाला तात्काळ आमच्याच शाळेचे शिक्षक आम्हाला देण्यात यावा, तसे न झाल्यास सोमवार पासून वडीरामसगांव येथील जि.प. प्राथमिक मराठी शाळेला कुलूप ठोकण्यात येईल, याची जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील याची नोंद घेण्यात यावी, अश्या अनुषंघाचे पत्र गट शिक्षण अधिकारी यांना आज स्वराज्य वार्ता लाईव्ह न्युज चे मराठवाडा विभागीय प्रतिनिधी तसेच समाजसेवक अनिरुद्ध साबळे यांनी सादर केले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!