शहापूर प्रतिनिधी, दीपक विशे.
रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲ. बापुसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली

ठाणे जिल्ह्यात होणारी अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिक जसे भात भाजीपाला वरई नागली उडिद पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे सरकार ने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी ठाणे जिल्हा रयत शेतकरी संघटना यांच्या वतीने शहापूर तालुक्या चे नायब तहसीलदार श्री बांबळे व मुरबाड तालुका नायब तहसीलदार श्री संदीप नायर यांना पत्र देऊन येत्या पंधरा दिवसात ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र धारवणे महिला ठाणे जिल्हा अध्यक्ष सुनीता ताई दिनकर, ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कालुराम भोईर, ठाणे जिल्हा सचिव यशवंत वाख , ठाणे जिल्हा उपध्यक्षा कांचन ताई कापडी , ठाणे जिल्हा सदस्य करुणा ताई घावट पुष्पा ताई देशमुख उपस्थित होते.
