जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन
जगभरात आजचा दिवस म्हणजे २४ मार्च जागतिक क्षयरोग दिन (World Tuberculosis Day) म्हणून साजरा केला जातो. क्षयरोग अर्थात टीबी बद्दल जनजागृती वाढवण्यासाठी आणि या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती केली जाते. १८८२ मध्ये डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगला (टीबी) कारणीभूत असलेल्या जीवाणूचा शोध लावला. आणि त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. क्षयरोग (टीबी) बद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे आणि या रोगाच्या गंभीर परिणामांबद्दल माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन आजच्या दिवशी केले जाते. क्षयरोग लवकर ओळखणे आणि त्यावर योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करायला हवे
याबद्दल माहिती देताना डॉ नितीन महाजन ग्रॅण्टरोड जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी रॅली ची आयोजन केले व रॅली मध्ये विद्यार्थी नर्सिंग स्टुडन्ट, आरोग्यसेविका अशावर्कर व टीबी मध्ये कार्यरत स्टाफ यांनी सहभाग घेऊन रॅली मधून क्षयरोग जनजागृती चा संदेश दिला व क्षय रोगाला संपवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले त्यानिमित्ताने स्ट्रीट प्ले व पारंपरिक लेझीम चे आयोजन करण्यात आले क्षय रोगाला संपवण्याची शपथ घेण्यात आली.


टीबी हारेगा देश जितेंगा या ब्रीद वाक्याने ग्रॅण्टरोड जिल्ह्यात आवाज दुमदूमला,

क्षय रोगाबद्दल माहिती तपशील डॉ नितीन महाजन यांच्या कडून मिळाला
१८व्या शतकाच्या उत्तरार्धात जगभरात क्षय रोगाच्या जागतिक साथीने थैमान घातले होते. २४ मार्च,१८८२ रोजी जर्मनीमधील ‘बर्लिन इन्स्टिट्यूट ऑफ हायजीन’ या प्रयोगशाळेत, अनेक विद्वान शास्त्रज्ञांसमोर डॉ. रॉबर्ट कॉक याने क्षय रोगाचे कारण असलेला जीवाणू शोधून काढल्याची माहिती दिली. तेव्हा पासून त्याला, म्हणजे क्षय रोगाला ‘कॉक्स डिसीज’ असे नाव दिले गेले. क्षय रोगाच्या घातक जैविक प्रसारामुळे होणाऱ्या समाज घटकावरील परिणामांचे कारण असणारा जीवाणू सर्वांसमोर आला आणि युरोप-अमेरिकेसह इतर अविकसित देशांनाही या घटक जीवाणूंचे निदान झाल्यामुळे तो बरा होण्याची आशा निर्माण झाली.

१९८२ मध्ये रॉबर्ट कॉकने शोध लावल्यानंतर बरोबर १०० वर्षांनी जागतिक क्षयरोग आणि फुफ्फुसरोग संघटनेने, २४ मार्च हा दिवस अधिकृतरीत्या ‘जागतिक क्षयरोग दिवस’ म्हणून घोषित केला. त्यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने “क्षय रोगाला हरवा : आता आणि कायमस्वरूपी ” असे त्यावर्षीचे विषय शीर्षक (theme) प्रसारित केले.

अविकसित व गरीब राष्ट्रांबरोबर संपन्न आणि विकसित देशांनाही ही समस्या भेडसावत होती. १९९८ साली २०० स्वयंसेवी संघटनांनी जागतिक क्षय रोग दिनी लंडन येथे बैठक घेतली. २२ क्षयरोगग्रसित देशांची यादी बनवली गेली व त्याबद्दल सर्वत्र जागरूकता अभियान सुरू केले.

२४ मार्च या दिवशी ‘डीओटीएस (DOTS)’ म्हणजे ‘डायरेक्टली ऑब्झर्व्हड थेरपी शॉर्ट कोर्स’ ही चिकित्सा प्रणाली, जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील हैदराबादच्या महावीर हॉस्पिटलमध्ये सर्वप्रथम लागू केली. तोवर जगभरातील एकाही देशाकडे क्षयरोगाशी लढणारी प्रतिकारशक्ती योग्य मात्रेत अस्तित्वात नव्हती. क्षयरोगाची बीसीजी ही लस लहान मुलांमधील क्षय रोगाचा काही अंशी प्रतिबंध करते; पण उपचार हे ताकतीने करावे लागतात.
आपल्याला केवळ श्वासमार्ग किंवा फुप्फुसाचा क्षयरोग माहिती आहे. पण क्षयरोग हा शरीरातील अनेक अवयवांना ग्रासतो. त्यात यकृत, प्लिहा, हाडे, मणके, त्वचा, आतडी, मेंदू हे अवयवही येतात. यांचा क्षयरोग हा अधिक घातक स्वरूपाचा समजला जातो.
योग्य वेळी निदान आणि ९ किंवा ११ महिन्यांची डॉट्स चिकित्सा प्रणाली अधिक उपयोगी ठरते. जगभरातील क्षयरुग्णांना दिलासा देणारी औषधे या क्षयरोग दिनीच बाजारात आली. आणि क्षय रुग्णांचा प्रवास सुकर झाला. लस आणि प्रभावी उपचाराच्या माध्यमातून जरी क्षयरोग आता पूर्णतः बरा होत असला, तरी तो अजूनही काही विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या उद्दिष्टानुसार अजूनही क्षयरोगाचे निर्मूलन पूर्णतः झालेले नाही. त्यासाठी जागतिक पातळीवर आजही प्रयत्न चालू आहेत. जागतिक क्षयरोग दिनी, असे अनेक नवनवीन उपाय आणि अशा नवनवीन संकल्पना राबविल्या जातात.
उपस्थित कर्मचारी व आरोग्य अधिकारी डॉ नितीन महाजन, संदीप खरात ,आरती म्हात्रे, यशश्री सावंत, शशांक बांदकर, राम यादव, निलेश म्हात्रे, जीवेश ढवळे, श्रीराम केदार, हरीश हिवाळे, अरबाज देशमुख यांनी रॅली यशस्वी केली व जनजागृती चा संदेश लोकांपर्यंत पोहचवला.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!