जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

घनसावंगी तालुक्यातील पांगरा येथे शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात घरे बांधलेलीच नाहीत, अशाही लोकांच्या नावावर घरकुलाचे पैसे लाटण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी इंजिनीअर मापारी यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पांगरा येथील ग्रामस्थ सावजी राजाराम राठोड यांनी गटविकास अधिकारी (BDO) यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

कागदावरच घरे; प्रत्यक्षात मात्र पैसे गायब?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पांगरा ग्रामपंचायत अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत मोठा घोळ झाला आहे. गावातील अनेक लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात घराचे कोणतेही बांधकाम केलेले नसताना, केवळ कागदोपत्री बोगस कामे दाखवून त्यांच्या खात्यावर शासकीय अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार संबंधित शाखा अभियंता (इंजि

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!