जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

सद्गुरु समर्थ दत्ताप्पा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अधिक मासाचे औचित्य साधून सामूहिक गोसेवा, गोपूजन, गोग्रास तसेच गाईंना फलाहार देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात हनुमान चालीसा पठणाने करण्यात आली. त्यानंतर विष्णुसहस्रनामाचे सामूहिक वाचन करण्यात आले. उपस्थित भाविकांनी गोमातेचे सामूहिक पूजन व महाआरती करून गाईंना आपल्या हस्ते फलाहार अर्पण केला.

यावेळी संजय विसपुते, डी. के. चोपडे, दादा केशव पेंटर, भागवत बाबा चौधरी, हेमंतजी विसपुते, डॉ. पी. कुमार वडनेरे, सुनीलभाऊ सोनार, दयारामभाऊ बागुल, गोविंदजी वानखेडे, रतिलालभाऊ बारेला, राजेश बिरारी, महेशजी सोनवणे, सौ. निर्मलाताई देवरे, मंगलाताई वानखेडे, कल्पनाताई वरकड, विजयाताई चोपडे, चंद्रकलाताई चौधरी, दीपिका बिरारी, सारिकताई विसपुते, रेखाताई बागुल, ज्ञानदा कोल्हे, माधुरीताई सोनवणे, संगीता ताई अवचार, सरला ताई भाई,देशमुख ताई यांच्यासह अनेक भाविक भक्त उपस्थित होते.

कार्यक्रमाची संकल्पना व नियोजन सचिव जगदीश देवरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रदीप कोल्हे ,निरज देवरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाची सांगता “गोमाता की जय” तसेच “ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः” या मंत्राच्या जयघोषाने करण्यात आली.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!