जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

घनसावंगी, ता. 3 : उन्हाळ्यापूर्वी देखभाल-दुरुस्तीची मोठी आश्वासने देणाऱ्या महावितरणचे नियोजन कागदावरच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्याच्या सर्वच भागांत वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. उन्हाळ्याच्या दि वसांत ४१ अंशांवर तापमान गेले आहे. कडाक्याच्या उष्णतेमुळे नागरिक आधीच हैराण असताना, त्यात वीज गे ल्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. केवळ वीज खंडित होणे इतकीच समस्या नसून, विजेच्या कमी-अधिक दाबामुळे घरातील महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळण्याचे प्रमाणही वाढले आहे.

अनेक ठिकाणी ओव्हरलोडमुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये वारंवार बिघाड होत आहेत. हे बिघाड दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नाहीत. दरवर्षी उन्हाळा येणार हे माहीत असूनही महावितरणने पूर्वतयारी का केली नाही, असा संतप्त सवाल ग्राहक विचारत आहेत. महावितरणच्या ढिसाळ कार भारामुळे शेती कामांवरही परिणाम होत असून, ग्रामीण भागात आम्ही वीज बिल वेळेवर भरतो, मग आम्हाला ही नरक यातना का ? महावितरणने ग्राहकांना वेठीस धरणे थांबवावे. रात्री वीज गुल झाल्यामुळे नागरिकांना रात्र जागरन करावे लागत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!