गोहत्याबंदीची अंमलबजावणी करा; तहसीलदारांना निवेदन
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
घनसावंगी तालुक्यासह जिल्ह्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी आणि अवैध पशू वाहतुकीवर तातडीने लगाम लावावा, या मागणीसाठी सोमवार (ता. २७) विविध सामाजिक संघटना आणि गोप्रेमींच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातून गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने गोहत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणावी. तसेच गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आली. सदर निवेदन तहसीलदार रमेश पागोटे यांनी स्वीकारले.
