मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे.

घनसावंगी : शेतकरी पुत्र राजेंद्र अटकळ यांची टरबूज खरेदीत आर्थिक फसवणूक करून पसार झालेल्या पश्चिम बंगालमधील व्यापाऱ्याने अखेर पोलिसांच्या दबावामुळे शरणागती पत्करली आहे. पोलीस अधीक्षक जानव्ही शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे आणि शेतकरी युवा संघर्ष समिती, घनसावंगी ने दाखवलेल्या खंबीर भूमिकेमुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

घनसावंगी तालुक्यातील शेतकरी पुत्र राजेंद्र अटकळ यांच्याकडून मोठ्या प्रमाणात टरबुजाची खरेदी करून पश्चिम बंगालमधील एका व्यापाऱ्याने त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला होता. या व्यापाऱ्याने फसवणुकीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केला. त्याने सुरुवातीला राजेंद्र अटकळ यांच्या फोन-पे (PhonePe) वर पैसे पाठवले; मात्र काही वेळातच सायबर विभागाच्या मार्फत तांत्रिक खेळी करून ते पैसे पुन्हा स्वतःच्या खात्यावर रिटर्न ओढून घेतले. इतकेच नाही, तर ज्या खात्यावर पैसे पाठवले होते, ते शेतकऱ्याचे बँक खाते देखील लॉक (Block) करून टाकले.

शेतकरी युवा संघर्ष समितीची पश्चिम बंगालमध्ये धडक

हा अन्याय सहन न करता शेतकरी युवा संघर्ष समिती, घनसावंगी चे पदाधिकारी अत्यंत आक्रमक झाले. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी समितीचे पदाधिकारी स्वतः पश्चिम बंगालमध्ये गेले आणि तेथील स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संबंधित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करून आले. समितीने दाखवलेल्या या धाडसामुळे आणि कायदेशीर लढ्यामुळे हे शक्य झालेले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!