ठाणे जिल्हा प्रतिनिधी.

अलीकडे गोवा येथील कोलवा बीच येथे भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातून सुमारे हजारो जलतरणपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या स्पर्धेमध्ये ठाणे येथील कु. अर्णवी अभय स्वाती पाटील हिने उत्कृष्ट कामगिरी करत पाचवा क्रमांक पटकावला. तिच्या या यशस्वी कामगिरीमुळे ठाणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अर्णवीच्या या यशाबद्दल ठाणेकरांकडून तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!