जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.
2008 मधील रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची अखेर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने आज (21 मे) हा महत्त्वाचा निकाल दिला. तब्बल 18 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला असून, सुनावणीदरम्यान राज ठाकरे स्वतः न्यायालयात उपस्थित होते. सरकारी पक्षाकडून ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आल्यामुळे न्यायालयाने त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

हे प्रकरण 2008 मधील रेल्वे भरती आंदोलनाशी संबंधित आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर झालेल्या हल्ल्यांनंतर राज ठाकरे यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्यांचे आरोप ठेवण्यात आले होते. “मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीय घेत आहेत” या मुद्द्यावरून आंदोलन पेटलं होतं. मात्र, या प्रकरणात आरोपींचा थेट सहभाग सिद्ध करणारे पुरावे नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयाने राज ठाकरे यांना दिलासा दिला.
वर्ष २००८ साली भूमिपुत्रांच्या रेल्वेतील रोजगारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. ह्या प्रकरणाने अध्यक्ष राज ठाकरे ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आन न्यायालयाने राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता केली.
