मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे.

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील ७९ कोटींचा अनुदान घोटाळा आता भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अंगलट आला आहे. माजी मंत्री तथा आमदार माननीय श्री बबनरावजी लोणीकर यांनी हा मुद्दा मंत्रालयात लावून धरल्यानंतर, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या महाघोटाळ्याप्रकरणी दोन्ही तहसीलदारांसह एकूण ५५ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी (Divisional Inquiry) करण्याचे आदेश मंत्रालयाने निर्गमित केले असून, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.

अशा प्रकारे लाटला ७९ कोटींचा निधी:

तपासात आणि प्राप्त तक्रारींनुसार, या ५५ अधिकाऱ्यांनी संगनमताने शासनाची आणि शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. निधी लाटण्यासाठी खालील धक्कादायक मार्ग अवलंबले गेले:

पडीक जमीन: ज्या जमिनीवर वर्षानुवर्षे काहीच पिकत नाही, अशा पडीक जमिनींचे मालक बोगस लाभार्थी म्हणून दाखवून निधी लाटला.

गावठाण जमीन: चक्क गावठाण जमिनीवर पिके असल्याचे दाखवून बोगस लाभार्थी उभे केले गेले.

दुसऱ्या जिल्ह्यातील लाभार्थी: या घोटाळ्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की, चक्क दुसऱ्या जिल्ह्यातील व्यक्तींच्या नावे अंबड आणि घनसावंगी तालुक्यात लाभार्थी दाखवून लाखो रुपये हडप करण्यात आले.

गायरान धारक: शासकीय गायरान जमिनींचे धारक देखील बोगस लाभार्थी म्हणून दाखवून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्यात आला.

आमदार बबनराव लोणीकर यांचा मंत्रालयात यशस्वी पाठपुरावा, आमदार बबनराव लोणीकर यांनी या सर्व प्रकाराचे सज्जड पुरावे सादर केले आहेत.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!