जळगाव प्रतिनिधी,

आदिवासी समाज बांधव व इतर मागासवर्गीय गरजु कुटुंबांकडे शिधापत्रिका नसणे, १२ अंकी नंबर नसणे, नविन नावे वाढविणे इ. बाबत आपल्या स्तरावरुन तात्काळ शिधापत्रिकाचे (रेशन कार्ड) वडनगरी हे गाव मध्य ठिकाणी असल्याने या गावात सदरील कॅम्प लावून मिळणेबाबत निवेदन ही सामाजिक कार्यकर्ता गोरख गायकवाड यांच्या नेतृत्वात जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर करण्यात आले.

जळगांव तालुक्यातील प्रामुख्याने वडनगरी, फुपनगरी, खेडी, आव्हाणे, कानळदा इ. गावामध्ये आमचा आदिवासी समाज हा आज रोजी वास्तव्यास आहे. परंतु आमचा समाज हा अशिक्षीत असल्याने आमच्या समाजातील बहुतेक कुटुंब हे विटभट्टीवर काम करणे, ऊसतोड करणे इ. कामा निमीत्ताने वर्षातून ७ ते ८ महिने बाहेरगावी असतात. त्यामुळे त्यांचेकडे रेशनकार्ड वगैरे त्यांनी काढलेले नसते. तसेच यातील अनेक कुटुंबाची मुले ही शिक्षण घेत आहेत. परंतु अनेक कुटुंबाकडे तसेच त्यांचे पाल्यांकडे तसेच त्यांचे स्वत:जवळ शिधापत्रिका ( रेशनकार्ड) उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. तरी आमच्या आदिवासी समाजातील कुटुंब व शिक्षण घेत असलेल्या पाल्यांना व कुटुबांना रेशनकार्ड मिळणेसाठी व शासनाच्या सुविधा मिळणेकामी कॅम्पेचे आयोजन करण्यात यावे, जेणेकरुन संबंधितांना त्यांचे सोईनुसारच त्यांना रेशनकार्ड मिळतील आणि त्यांना शासकीय योजनेचा लाभ या कुटुंबांना मिळेल व त्यांचे सर्वांगिण विकासात व शैक्षणिक विकासासाठी आपले अमूल्य योगदान लाभेल अशी आम्हांस आशा आहे. तसेच महत्वाचे सद्यस्थितीत शासकीय रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयामध्ये गरीब गरजू लोकांसाठी मोफत उपचार देण्यात येत असतात. परंतु त्यासाठी संबंधितांकडे रेशनकार्ड असणे गरजेचे आहे. परंतु आमच्या समाजातील बांधवांकडे रेशनकार्डच नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित रहात असतात. तसेच त्यांना शेवटी नाईलाजाने दुसरीकडे जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यात ज्या कुटुंबाची परिस्थिती ही हातमजुरीची आहे ते पैशाचे अभावाने उपचार घेण्यास टाळाटाळ करीत असतात त्यामुळे अनेक कुटुंबांतील सदस्यांना आपल्या जीवास मुकावे लागत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

तसेच ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका आहेत परंतु त्यावर १२ अंकी नंबर नसल्यामुळे त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या धान्यादी मालापासून वंचित रहावे लागत असते. त्यामुळे त्याबाबत ते संबंधित कार्यालयाकडे विचारपूस करावयास गेले तर त्यांना सांगण्यात येते की यासाठी तुम्हांस १२०० ते १५०० रुपयांपर्यंत खर्च येईल.तसेच पैसे देऊनही तुम्हांस ३ ते ४ महिन्यांनी सदरील नंबर येईल व त्यानंतर धान्य मिळेल अशी उडवा उडवीचे उत्तरे देण्यात येत असतात. असे मत सामाजिक कार्यकर्ता गोरख गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधी यांच्या कडे व्यक्त केले, तसेच येत्या १५ दिवसात याविषयावर समाधान कारक कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या.

१) आमच्या कानळदा-भोकर गट अंतर्गत येणाऱ्या आदिवासी समाज बांधव व इतर मागासवर्गीय गरजु कुटुंबांकडे शिधापत्रिका नसल्यामुळे त्यांना शिधापत्रिका मिळणेसाठी
आपल्या स्तरावरुन तात्काळ कॅम्प लावणेबाबतचे आयोजन करण्यात यावे.

२) तसेच ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका आहेत, परंतु त्यावर १२ अंकी नंबर नसल्यामुळे त्यांना शासनाकडून मिळणारे धान्य तसेच दवाखाना वगैरे येथील उपचाराच्या सुविधा मिळत नसतात. त्यामुळे त्यांचे खूपच हाल होता. तरी अशा कुटुंबांतील शिधा पत्रिकांधारकांकडे असणाऱ्या शिधापत्रिकांना तात्काळ १२ अंकी नंबर देण्यात येऊन त्यांना शासनाच्या सर्व योजनाचा लाभ मिळण्यात यावा.

३) अनेक कुटुंबाकडे असलेले रेशनकार्ड हे जुने व जीर्ण झालेले असल्यामुळे त्यावर कुटुंबातील सदस्यांची नावे वगैरे दिसत नाही, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे
लागत असते. तरी ज्या कुटुंबाकडे असलेले रेशनकार्ड हे जिर्ण व जुने झाले असेल त्यांना तात्काळ नवीन रेशनकार्डचे वाटप करण्यात यावे म्हणजे त्यांना होत असलेला त्रास थांबेल.

४) तसेच अनेक कुटुंबात सदस्थितीत नविन सदस्य वाढलेले आहेत. परंतु त्यांची नावे ही रेशनकार्ड मध्ये नोंदविण्यात आलेली नाही त्यामुळे अशा नविन सदस्यांची नावे
वाढविण्यात यावी जेणेकरुन त्यांना शासनाचा लाभ मिळेल.

५) वडनगरी हे गाव कानळदा-भोकर गटात येणाऱ्या वरील गावांचे मध्यस्थानी येते असल्याने आजूबाजूच्या सर्व गावातील नागरिकांना वडनगरी याठिकाणे येण्याचे सोईस्कर होईल. तरी आपणांकडून आमच्या गावात आपण शिधापत्रिका (रेशनकार्ड) मिळणेसाठी कॅम्प लावण्यात यावा, तसेच यासाठी लागणारी सर्व मदत करण्यास समस्त ग्रामस्थ तयार आहोत.

जळगांव तालुक्यातील संबंधित शासकीय यंत्रणेला व सेतू सुविधा मध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रव्यवहार करुन त्यांना आदिवासी भिल्ल समाजासाठी शिधापत्रिका (रेशनकार्ड) चे कॅम्प लावणेबाबत सूचित करण्यात यावे.
तसेच यासाठी होत असलेली शासकीय फी व इतर सुविधा पुरविणेस आम्ही तयार आहोत.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता गोरख गायकवाड, लखन चौतमोल तसेच यावेळी कानळदा भोकर गटा अंतर्गत येणाऱ्या गावातील रहिवासी, सुनंदा बाई मोरे, मिरा बाई, मिना बाई, पिटा बाई व इतर महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!