जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.
मेहरूण, ता. जळगाव :
रामेश्वर कॉलनी, मेहरूण येथील शरद सुरेश इंदलकर यांनी पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्यांनी तलावातील गाळ आणून सुमारे १५० झाडांची रोपे तयार करून ती लावण्याचा तसेच नागरिकांना लावण्यासाठी देण्याचा संकल्प केला आहे.

वाढते तापमान आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता प्रत्येकाने वृक्षलागवड करून निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश त्यांनी या उपक्रमातून दिला आहे. स्वतः मेहनत घेऊन रोपे तयार करत त्यांचे संगोपन करण्याचे कार्य ते करत असून त्यांच्या या हरित उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
“प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केल्यास पर्यावरण संतुलन राखण्यास मोठी मदत होईल,” असे आवाहनही शरद इंदलकर यांनी केले आहे. 🌿🙏
