जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
जालना उपविभागातील वाढती गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
प्रकारची दुकाने, हॉटेल्स, ढाबे आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्री १०.३० वाजता बंद करावी लागतील.
जबाबदारी संबंधित पोलीस अंमलबजावणीची अशा प्रकरणांची नोंद स्टेशन डायरीमध्ये करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही गस्त घालणाऱ्या पथकांना देण्यात आले आहेत.
शहरातील शांतता अबाधित, पोलीस अधिक्षक कार्यालय, जालना
जालना उपविभागातील सर्व दुकाने, हॉटेल्स, ढाबे आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने आता दररोज रात्री १०.३० वाजेपर्यंत पूर्णपणे बंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत.

काय आहेत पोलीस अधीक्षकांचे आदेश ?
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून ६ मे २०२६ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या पत्रात (जा.क्रं/स्विस/पोअ/आस्थापने बंद आदेश/२०२६/२६३) स्पष्ट करण्यात आले आहे की:
व्यावसायिक प्रतिष्ठानेः सर्व ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनी य आदेशाचे काटेकोरपणे पालन होईल याची खात्री करावी.
रात्र गस्तः रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांची जबाबदारी वाढली आहे.
